३० जानेवारी २०२१,
जगाला आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून रहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून बनाल अस काही गेली १८ वर्ष सातत्याने काहीतरी वेगळं करायचं असा निश्चय करून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत असलेले डॉ.धनंजय वर्णेकर यांना नुकताच कोईमतूर येथे जागतिक पातळीवरील Unicef ने ग्लोबल अचिव्हर अवॅार्ड देऊन सन्मानित केले.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल या संस्थेचे संस्थापक असलेले डॉ. धनंजय वर्णेकर यांना आत्तापर्यंत केलेल्या कार्यासाठी अनेक देश व विदेशामधून विविध पुरस्कारासाठी सन्मानित केले गेले आहे. पण शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक स्तरावरील तरुण-तरुणी, रोजगार प्रशिक्षण, महिला सक्षमिकरण, महिला व गरजु विद्यार्थी व अनाथ मुलांचे संपूर्ण संगोपन व शिक्षण यांच्याकरिता त्यांनी केलेल्या कार्याची दखल Unicef ने घेऊन त्यांना ग्लोबल अचिव्हर अवॅार्ड ने सन्मानित करण्यात आले.
गेली १८ वर्षे महिलांना विविध मोफत प्रशिक्षण, तरुण-तरुणींना प्रशिक्षण, आदिवासी तरुण-तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण, समाजातील आर्थिक दुर्बल तरुणांना रोजगार प्रशिक्षण, अनाथ मुलांची संपूर्ण देखभाल, कोरोना काळात गरजूंना अन्नदान अशा अनेक कार्यामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन Unicef ने त्यांची निवड केली. पुढील काळात कार्य करण्याची उमेद तयार होते असे त्यांना वाटले. कोईमतूर येथे नुकताच कार्यक्रम पार पडला या प्रसंगी Unicef फ्रान्सचे अॅबेंसिटर, इंडिया चे सेक्रेटरी, डायरेक्टर व इतर मान्यवर उपस्थित होते.