Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीअभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार

२० ऑक्टोबर २०२०,
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार असून, प्रवेशासाठीची मुदत ३० नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे.

एआयसीटीईने १३ ऑगस्टला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला आणि अन्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्षांपासून पुढील वर्ग १६ ऑगस्टपासून तर नव्या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार होते. पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे निकाल करोना संसर्गामुळे जाहीर होण्यात अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्याबाबत एआयसीटीईने महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता अभियांत्रिकीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे.

परिषदेने अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीची मुदत ३० नोव्हेंबर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम वर्षांचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होतील,’ असे नमूद केले आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments