Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा पहिला डोस या...

उद्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा पहिला डोस या ठिकाणी मिळणार

१० जुलै २०२१,
उद्या दि.११/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. वय १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.११-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला डोस लाभार्थी क्षमता
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे १८ ते ४४२००
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४२००
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४२००
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४२००
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४२००
नवीन जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणेवय वर्षे १८ ते ४४२००

तसेच उद्या दि.११/०७/२०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला डोस लाभार्थी क्षमतादुसरा डोस लाभार्थी क्षमता
प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे ४५ पुढील     १००  १००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१००  १००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील१००  १००
नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१००  १००
निळु फुले नाटयगृह, सांगवीवय वर्षे ४५ पुढील१००  १००
अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागरवय वर्षे ४५ पुढील१००  १००
पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील१००  १००
प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००  १००

वय ४५ वर्षा वरील लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर दि.११/०७/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.११/०७/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर ५० लाभार्थीचे डोस राखीव ठेवण्यात येत असून लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाव
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी
यमुनानगर रुग्णालय
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
नवीन जिजामाता रुग्णालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments