८ जुलै २०२१,
उद्या दि.०९/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
१८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०९-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
अ.क्र | लसीकरण केंद्राचे नाव | वयोगट | पहिला डोस लाभार्थी क्षमता |
१ | सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
२ | कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
३ | यमुनानगर रुग्णालय | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
४ | आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
५ | अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
६ | खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
७ | नवीन जिजामाता रुग्णालय | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
८ | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे | वय वर्षे १८ ते ४४ | २०० |
तसेच उद्या दि.०९/०७/२०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
अ.क्र | लसीकरण केंद्राचे नाव | वयोगट | पहिला डोस लाभार्थी क्षमता | दुसरा डोस लाभार्थी क्षमता |
१ | प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती | वय वर्षे ४५ पुढील | १०० | १०० |
२ | इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड | वय वर्षे ४५ पुढील | १०० | १०० |
३ | मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल | वय वर्षे ४५ पुढील | १०० | १०० |
वय ४५ वर्षा वरील लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर दि.०९/०७/२०२१ रोजी सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.