कौटुंबिक कलहामुळे गायकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा खोलात तपास करत आहेत.
मनोरंजन क्षेत्रातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी लोक गायकाचं निधन झालं आहे. रणजीत सिद्धू असं त्यांचं असून त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. शुक्रवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी केलेल्या तपासांती रेल्वे ट्रॅकवर पडलेला मृतदेह गायक रणजीत सिद्धू यांचा असलेल्याचं समोर आलं. कौटुंबिक कलहामुळे गायकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा खोलात तपास करत आहेत.
रणजीत सिद्धू यांच्या मृत्यूप्रकरणात जीआरपी एसआयची माहिती समोर आली आहे. GRP आणि SI जगविंदर सिंह आणि नरदेव सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांना शुक्रवारी रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह सापडला. पोलिसांनी त्या मृतदेहाचा तपास केला. तेव्हा हा मृतदेह दुसऱ्या कोणाचा नसून नछतर सिंह यांचा मुलदा रणजित सिंह यांचा असल्याचं समोर आलं आहे.मृतदेह सापडल्यानंतर त्वरित त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. गायकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
रणजित सिद्धू यांच्या बायकोनं पोलिसांना माहिती दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांवर आरोप केले आहेत. रणजित यांचं नातेवाईंबरोबर भांडण झालं होतं. त्याचे नातेवाईक नेहमी त्यांचा छळ करत होते. नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून रणजित यांनी आत्महत्या केली. रणजित सिद्धू यांच्या पत्नीनं पुढे म्हटलं की, काही महिन्यांआधीच आम्ही आमच्या मुलीचं लग्न केलं. तेव्हापासून आमचे नातेवाईक आमच्याबरोबर भांडण करत आहेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
रणजित सिद्धू यांच्या आत्महत्येची नोंद पोलिसांत करण्यात करण्यात आली आहे. रणजित यांचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोस्टमार्टमनंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.