१८ जानेवारी २०२१,
गेल्या २५ वर्षांपासून पाटोदा गावात आदर्श सरपंच म्हणून बाजी मारणारे भास्कररावर पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलला मात्र यंदाच्या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. यामध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटोद्यात पॅनल उभे केले. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनुराधा पाटील यांना १८६ मतं मिळाली आहे तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले दुर्गेश खोकड यांनी २०४ मतं मिळवून विजय मिळवला आहे. भास्करराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे.
पाटोदा गावातील ११ जागांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडणून आले होते. तर, बाकीच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून संपूर्ण ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलनं सत्ता मिळवली आहे.