Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमीआघाडीचे गणिते बिघडविणाऱ्या राहूल कलाटेंचे डिपॉजिट झाले जप्त …

आघाडीचे गणिते बिघडविणाऱ्या राहूल कलाटेंचे डिपॉजिट झाले जप्त …

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आघाडीतील ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे तेथील आघाडी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले. मात्र, आघाडीला धक्का देणाऱ्या कलाटेंनाही धक्का बसला आहे त्यांचे डिपॉजिट जप्त झाले.

महाविकास आघाडीचे नाना काटे वगळता कलाटेंसह चिंचवड मतदारसंघातील इतर सर्व २६ उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉजिट जप्त झाले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या चिंचवड मतदारसंघात ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदान केले.त्याच्या एक षष्टांश म्हणजे १६.६ टक्के मते (४७ हजार ६६६)अनामत शाबूत राहण्यासाठी मिळणे गरजेचे होते.हा कोटा फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे यांनी पूर्ण केला.त्यांना ९९,३४३ मते पडली. तर,कलाटेंसह बाकीच्या सर्व २६ उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आला नाही. कलाटेंना ४४,०८२ मते मिळाली. त्यामुळे विधानसभेला सलग तीनदा पराभवाची हॅटट्रिक चाखलेल्या कलाटेंवर यावेळी डिपॉजिटही गमावण्याची नामुष्की आली.

गतवेळी २०१९ ला लक्ष्मण जगतापांविरुद्ध कलाटेंनी एक लाख १२ हजार मते घेतल्याने यावेळी हमखास निवडून येईल,असा दावा त्यांनी केला होता.त्या पार्श्वभूमीवर ते डिपॉजिटही वाचवू न शकल्याने त्यांच्या या दाव्याची चर्चा आता सुरु झाली आहे. आपण जनतेच्या मनातले उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले होते.या जनतेनेच त्यांचे डिपॉजिट जप्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments