Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकचिंताजनक शहरात कोरोनाचा हाहाकार …पिंपरी चिंचवड शहरात आज ३३९५ नवे कोरोना बाधीत...

चिंताजनक शहरात कोरोनाचा हाहाकार …पिंपरी चिंचवड शहरात आज ३३९५ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू

४ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ४ एप्रिल २०२१ रोजी ३३९५ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ३३८२ तर शहराबाहेरील १३ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १५०९२८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२६६३५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २०६५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १२ पुरुष चिखली (६३, ४६, ७६ वर्षे), थेरगाव (५८, ८० वर्षे), रहाटणी (६० वर्षे), वाल्हेकरवाडी (६३ वर्षे), चिंचवड (४६ वर्षे), पिंपळे गुरव (६७, ६० वर्षे), दिघी (५८ वर्षे), मोशी (३५ वर्षे), ०४ स्त्री – यमुनानगर (७० वर्षे), आळंदी रोड (९५ वर्षे), पिंपरी (३६ वर्षे), दिघी (३० वर्षे) येथील रहिवासी आहेत.पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – जळगाव (८२, वर्षे) ०१ स्त्री – औरंगाबाद (५४ वर्षे), येथील रहिवासी आहे.
टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ६ मृत्यु झालेले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या

अ.क्ररुग्णालय झोनकोविड- १९ बाधित रुग्ण संख्याअ.क्ररुग्णालय झोनकोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
आकुर्डी४००तालेरा५६६
भोसरी७०६थेरगाव३१४
जिजामाता४८६यमुनानगर४०६
सांगवी३४४वायसीएम१६०
  प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्रप्रभागकोविड- १९ बाधित रुग्ण संख्याअ.क्रप्रभागकोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
५००३७३
५११४१२
४६९३८७
५३४१९६

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments