Wednesday, January 22, 2025
Homeगुन्हेगारीमुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भररस्त्यात कंटेनरला आगीने वेढले

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भररस्त्यात कंटेनरला आगीने वेढले

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी मध्यरात्री एका कंटेनरला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरला माडप गावानजीक अचानक आग लागली. याची माहिती मिळताच पोलीस आणि IRB च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कंटनेरने रस्त्याच्या मध्येच पेट घेतल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे सुरुवातीला कंटेनर बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर कंटेनरला लागलेली आग विझवण्यात आली.

कंटेनरमधील वस्तुंनी पेट घेतल्यामुळे कंटेनरला आग लागल्याचे समजते. दरम्यान या कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणल्यानंतर सदर कंटेनर खालापुर टोलनाक्याजवळ आणल्यानंतर धुमसत असलेल्या आगीने पुन्हा पेट घेतला. यावेळी खोपोली फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. कंटेनरमधील धुमसत असलेल्या वस्तू जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्या. या घटनेमध्ये कंटेनर चालक मात्र सुखरुप आहे, कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यासदंर्भात खालापुर पोलीस स्टेशन मध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments