Tuesday, April 21, 2026
Homeगुन्हेगारीमुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहारात घातले लक्ष

मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहारात घातले लक्ष

या गैरव्यवहरामध्ये मिळकतकर विभागातील शिपायापासून सहायक आयुक्तांपर्यंत साखळी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराची वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालिकेतील भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नगरविकासमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या वर्षी २२ डिसेंबर रोजी केली होती. नगरविकास विभागाने त्याची सहा महिन्यांनी दखल घेत पिंपरी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

करसंकलन विभागात अनागोंदी कारभार सुरू असून प्रचंड गैरव्यवहार (corruption) होत असल्याची तक्रार वाघेरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. या गैरव्यवहरामध्ये मिळकतकर विभागातील शिपायापासून सहायक आयुक्तांपर्यंत साखळी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. गैरकारभाराची उदाहरणेही त्यांनी दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments