केंद्र सरकारने जीबीएसच्या बाबतीत मदत करण्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ टीम पाठवली आहे. आरोग्य मंत्रालयाने 7 सदस्यांची टीम पाठवली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, संशोधन आणि इतर विभागातील तज्ज्ञ पथके काम करत आहेत.
बॅक्टेरिया हे सिंड्रोमचे मुख्य कारण,
दुसरीकडे, सिंड्रोमचा पहिला रुग्ण 9 जानेवारी रोजी आढळला होता. त्याच्या नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया असल्याचे चाचण्यांमधून समोर आले. हा जीवाणू जगभरातील एक तृतीयांश GBS प्रकरणांमध्ये आढळला आहे. जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी रविवारी पुण्यात पाण्याचे नमुने घेतले होते. येथे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया सापडल्याबद्दल कोणतीही माहिती नाही. पुण्यातील मुख्य जलसाठा असलेल्या खडकवासला धरणाजवळील विहिरीत ई कोलाय या जीवाणूची पातळी खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
विहिरीचा वापर सुरू आहे की नाही हे स्पष्ट नाही. अधिकाऱ्यांनी लोकांना पाणी उकळून प्यावे आणि थंड अन्न खाणे टाळावे असा सल्ला दिला आहे. फक्त गरम अन्न खा, असेही आवाहन करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 25,578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साधारणत: एका महिन्यात फक्त 2 जीबीएस रुग्णांची नोंद होते. तथापि, अचानक ही संख्या वाढली आहे.