२६ ऑक्टोबर २०२०,
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपला. पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबरला म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar ) यांच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्र्यांच्या विश्वासार्हतेसह अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापैकी ४ भाजप आणि जेडीयू कोट्यातील ४ मंत्री आहेत. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला घेरलं आहे. तसंच अनेक जागांवर बंडखोर हे सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान बनले आहेत. अशा परिस्थितीत नितीशकुमारांच्या मंत्र्यांच्या जागांवर अत्यंत चुरशीची लढाईत दिसणार आहे.
बिहारमधील नितीशकुमार सरकारमधील ज्या ८ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यात गयाचे कृषिमंत्री डॉ. प्रेम कुमार, जहानाबादचे शिक्षणमंत्री कृष्णा नंदन वर्मा, जमालपूरचे ग्रामविकास मंत्री शैलेश कुमार, राजापूरचे दीनारा येथील विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जय कुमार सिंह यांचा समावेश आहे. परिवहन मंत्री संतोषकुमार निराला, बांका येथील महसूलमंत्री रामनारायण मंडळ, लखीसराय येथील कामगारमंत्री विजय कुमार सिन्हा आणि चैनपूरचे एससी व एसटी कल्याण मंत्री ब्रिजकिशोर बिंद यांचा समावेश आहे.

कांद्याच्या वाढत्या दरावरून तेजस्वींचा हल्ला
बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू-भाजप युतीला राष्ट्रीय जनता दलाचे ( RJD ) आव्हान आहे. या निवडणुकीत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव ( tejashwi yadav ) हे सतत महागाई, बेरोजगारी आणि बिकट अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. देशात कांद्याचे दर प्रति किलो १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. बर्याच शहरांमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो १४० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यावरून सोमवारी तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. भाजपवरही त्यांनी टीका केली.
कांद्याच्या वाढत्या दराचा निषेध करत तेजस्वी यादव यांनी माध्यमांसमोर कांद्याची माळ आणली होती. ‘महागाई हा सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजपच्या नेते कांद्याची माळ गळ्यात घालत होते. आता कांदा प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत गेला. बेरोजगारी आहे, उपासमारी वाढत आहे. छोटे व्यापारी नष्ट होत आहेत. दारिद्र्य वाढत आहे. जीडीपी कमी होत आहे. आपण आर्थिक संकटातून जात आहोत, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.
वाढत्या महागाईवरून तेजस्वी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं. वाढत्या महागाईवर ते गप्प का आहेत, मुग गिळून का बसले आहेत?, असा सवाल तेजस्वी यांनी केला. नितीशकुमार करत असलेल्या टीकांवरही त्यांना प्रश्न केला गेला. यातून नितीशकुमार यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असल्याचं मला वाटतं, असं तेजस्वी यादव म्हणाले.