Wednesday, June 18, 2025
Homeउद्योगजगतआज ‘पुणे बंद’ची हाक, 'हे' रस्ते असणार बंद, असा आहे वाहतुकीत बदल

आज ‘पुणे बंद’ची हाक, ‘हे’ रस्ते असणार बंद, असा आहे वाहतुकीत बदल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने आज, मंगळवारी ‘पुणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. आज, सकाळी नऊ वाजता निघणाऱ्या मोर्चामुळे लक्ष्मी रस्त्यासह मध्यभागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निषेध मोर्चाला सकाळी नऊ वाजता सुरुवात होईल. हा मोर्चा संभाजी पूल, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता अशा उलट दिशेने बेलबाग चौकात पोहोचणार आहे. तेथून डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने उलट दिशेने जिजामाता चौकात जाणार आहे. लाल महल येथे मोर्चा समाप्त होईल. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना या भागांतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मोर्चा पुढे सरकला की रस्ते खुले करण्यात येतील, असे वाहतूक उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

बंद राहणारे रस्ते

लक्ष्मी रस्ता : सोन्या मारुती चौक ते टिळक चौक या दरम्यान लक्ष्मी रस्ता सकाळी नऊपासून बंद राहील. मोर्चा पुढे सरकला की वाहतूक सुरू होईल

शिवाजी रस्ता : स. गो. बर्वे चौक ते बेलबाग चौक

बाजीराव रस्ता : पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक

गणेश रस्ता : फडके हौद ते जिजामाता चौक

केळकर रस्ता : अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक

नो पार्किंग : बेलबाग चौक ते टिळक चौकादरम्यान वाहने लावण्यास बंदी

पर्यायी मार्ग

मोर्चा सुरू असताना ‘पीएमपी’च्या बसची वाहतूक नरपतगिरी चौक, पंधरा ऑगस्ट चौक, पॉवर हाउस, केईएम हॉस्पिटल, संत कबीर चौक, सेव्हन लव्हज चौक आणि मालधक्का या भागातून वळविण्यात येणार आहे.

टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता सुरू राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments