हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ थरकार उडवणारे असतात. लहान मुलांना नेहमीच डोळ्यात तेल घालून संभाळावं लागतं. लहान मुलं सतत अतरंगीपणा करतात. इकडे जाऊ नको असं म्हटलं तर ते मुद्दाम त्या ठिकाणी जातात. यावेळी आई बाबा ओरडतात तर काही वेळा फटकेही देतात. मात्र तरीही ही मुलं तेवढ्यापुरत एकतात आणि मग पुन्हा तेच करतात. तर काही मुलं फक्त पालक समोर असल्यावर गपगुमान बसतात तर पालकांच्या मागे उचापत्या करतच असतात. दरम्यान चीन मधून एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात आईने काठीने मारहाण केल्याने घाबरलेला सहा वर्षांचा मुलगा खिडकीबाहेर लावण्यात आलेल्या एअर कंडिशन युनिटजवळ आला आणि नंतर उडी मारली. मुलगा बाहेरील कठड्यावर आल्यानंतर खालून जाणारे आणि शेजाऱ्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी ओरडत मुलाला मारु नका अशी विनंतीही केली. पण यानंतरही त्याची आई त्याला काठीने मारहाण करत होती. नंतर काही सेकंदात मुलाने अचानक उडी मारली.
आईच्या भितीनं मारीली उडी
२५ जून रोजी अनहुई प्रांतात ही घटना घडली आहे. उडी मारल्यानंतर मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवाने तो यामध्ये बचावला असून गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर आता खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. तसेच त्यांना समाजावून सांगणे ही महत्त्वाचे आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी संतापले आहेत. त्या मुलाच्या आईवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे.