Wednesday, January 22, 2025
Homeगुन्हेगारीपिंपरीतून अपहरण झालेल्या त्या ७ वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला…. ! पैश्यांसाठी खून...

पिंपरीतून अपहरण झालेल्या त्या ७ वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला…. ! पैश्यांसाठी खून …?

पिंपरीतील मासुळकर कॉलनीतून अपहरण झालेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला. ग्रीनफिल्ड सोसायटी येथे राहणारा सात वर्षीय मुलगा गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास खेळायला जातो असे सांगून घरातून गेला. दरम्यान, सव्वा सातच्या सुमारास सोसायटीत राहणारी एक मुलगी मुलाच्या घरी गेली. ‘ तुमचा मुलगा सापडत नाही’ असे सांगितले. त्यांनंतर मुलाचे आई वडील त्याला शोधण्यासाठी गेले. मात्र, तो सापडला नाही.

दरम्यान मासुळकर कॉलनीतुन बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह आढळून आला आहे. मुलाचे अपहरण करुन अपहरणकर्त्याने खून केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पैश्यांसाठी की आणखी कश्यासाठी झाला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

आदित्य गजानन ओगले (7, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आदित्य हा गुरुवारी सायंकाळी उशिरा पर्यत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी शोध घेतला, तो सापडला नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

आदित्य बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान गजानन ओगले यांना एक फोन आला आणि त्याने 20 कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सर्व ठिकाणी, वेगवेगळ्या पथकाच्या सहायाने तपास केला.

एका संशयितास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी परिसरात एका कंपनीच्या टेरेसवरती आदित्य याचा मृतदेह आढळून आला.आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. पोलिसांनी हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध सुरू केला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments