Saturday, September 30, 2023
Homeगुन्हेगारीकोथरुड मध्ये कॉलेजच्या मैदानावर पोत्यात विवस्त्र अवस्थेत मुलाचा आढळला मृतदेह

कोथरुड मध्ये कॉलेजच्या मैदानावर पोत्यात विवस्त्र अवस्थेत मुलाचा आढळला मृतदेह

पुण्यातील कोथरूड येथील एकलव्य कॉलेजच्या मैदानावर पोत्यात मतिमंद मुलाचा मृतदेह आढळून आला असून या मुलाच्या खुनाप्रकरणी एका आरोपीला कोथरूड पोलिसानी अटक केली आहे. करण गोपाळ राठोड, वय १३, असे खून झालेल्या विशेष मुलाचे नाव आहे. पिटू गौतम या आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोथरूडमधील एकलव्य कॉलेजच्या मैदानावर काल रात्री मुले खेळत होती. त्यावेळी एका पोत्यात अंगावर कपडे नसलेल्या मुलाचा मृतदेह आढळून आला.त्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता,त्याच भागातील करण गोपाळ राठोड याचा खून झाल्याचे पुढे आले. करणच्या पालकांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार काही दिवसांपूर्वीच दिली होती.

त्यानंतर काही तासात आरोपी पिटु गौतम याला अटक करण्यात आली. त्यावेळी आपणच करणवर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केल्याची आणि त्याचा मृतदेह पोत्यात भरुन टाकल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments