Monday, April 22, 2024
Homeताजी बातमीसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर...

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार-उमा खापरे

१५ जानेवारी २०२१,
“सामाजिक न्यायासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे”, असे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची महिला आघाडी आक्रमक झाली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाा सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

“सामाजिक न्याय खात्याचं मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले. तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले. याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे, याचा विचार करावाच लागणार आहे”, असं खापरे म्हणाले.

मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड रेणू शर्मा करत आहे. मुंडेंविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरुप पाहता तसंच या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.

“एकीकडे स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती सारखा कायदा आपण करतो. मात्र दुसरीकडे राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांवर महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये याचीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील”, असेही खापरे यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments