१३ ऑक्टोबर २०२०,
आयपीएलच्या १३व्या हंगाम बरोबर मध्यावर आला आहे. प्रत्येक संघाचे ७ साखळी सामने झाले आहेत आणि आता अखेरचे ७ सामने प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. आज मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर ३ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत चैन्नईची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. ७ पैकी त्यांना फक्त २ सामन्यात विजय मिळवता आला असून ते गुणतक्त्यात ७व्या स्थानावर आहेत. यापुढील ७ सामन्यात चेन्नईला किमान ५ मध्ये विजय मिळवावा लागले.
आयपीएलच्या इतिहासात असे कधीच घडले नाही की चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK नेहमीच पहिल्या चारमध्ये असतो. पण यावेळी ही गोष्टी अवघड दिसत आहे. अंतिम चारमध्ये जागा मिळवण्यासाठी त्यांना किमान पाच मध्ये विजय मिळवणे गरजेचे असेल. याआधी झालेल्या साखळी सामन्यात हैदराबादने चैन्नईचा पराभव केला होता.
धोनीने गेल्या सामन्यात बेंगळुरूविरुद्ध पराभव झाल्यानंतर मान्य केले होते की, फलंदाजी योग्य प्रकारे होत नाही. त्याच तातडीने बदल करण्याची गरज आहे. आज होणाऱ्या सामन्यात काही बदल होतो का हे पाहणे गरजेचे आहे. शेन वॉट्सन आणि फाफ डुप्लेसिस वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला धावसंख्या करता आलेल्या नाहीत.
आघाडीच्या फलंदाजांमध्ये अंबाती रायडू पहिल्या सामन्यात खेळला. त्यानंतर तो ही धावा करू शकला नाही. केदार जाधव अपयशी ठरला म्हणून एन जगदीशनला संधी दिली पण तोही वेगाने खेळू शकला नाही. धोनी, रविंद्र जडेजा आणि ब्राव्हो यांना देखील अपेक्षे प्रमाणे खेळता आले नाही. या सर्व अडचणीतून चेन्नईला मार्ग काढावा लागणार आहे.