Thursday, December 12, 2024
Homeगुन्हेगारीएअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

बिल्डिंगमध्ये विक्रम हाऊस किपिंगचे काम करायचा.

एअर हॉस्टेस रुपलची हत्या करणाऱ्या आरोपीने सकाळी अंधेरी परिसरात असलेल्या पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी विक्रम अटवाल याने पॅन्टचा सहाय्याने गळफास लावून घेतल्याची घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास घडली आहे.

रुपलच्या हत्या प्रकरणी अटवाल याला ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानुसार त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पवई येथे राहणाऱ्या रुपल आग्रे नावाच्या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक केली होती. तो सध्या पोलीस कोठडीत होता.

काही वेळात आरोपीचा मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तिथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. बिल्डिंगमध्ये विक्रम हाऊस किपिंगचे काम करायचा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments