Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणे पोलीस सुजाता शेलार ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती

ठाणे पोलीस सुजाता शेलार ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती

लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा महिला सन्मान उपक्रम

महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२४” या मेगा शो चे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून २० गृहिणींसह वैद्यकीय, पोलीस, अग्निशामक दल, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.

यामध्ये ठाणे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल सुजाता शेलार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचा मुकुट, पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र ज्येष्ठ कर सल्लागार शाळिग्राम तायडे आणि डॉ. प्रशांत इंनरकरयांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

द्वितीय पारितोषिक यांनिसा कलीम सय्यद यांना मुकुट, बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक शीतल वाघमारे यांना मुकुट, दहा हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना  सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

लहान मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक दहा हजार रोख मेधावी स्वप्नील काशिद आणि द्वितीय पारितोषिक सात हजार  रोख अनन्या यादव आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख रक्कम आरव गावफळे यांनी  पटकावले. 

परीक्षक म्हणून नैना वेदपाठक,  डॉ. दुर्गा लाडके, डॉ. शुभम आघाटे, मेघना भालेराव यांनी काम पाहिले. ग्रूमिंग नरेश फुलेलू , क्षितिज गायकवाड आणि टीना क्षत्रिय यांनी केले. कार्यक्रमाची आऊटफिट पियांशिका फॅशनच्या ऋतुजा खडके आणि रिवाज रेंटल च्या चैत्राली मरळीकर पाटोळे यांनी केले. वेशभूषा आणि केशरचना नेहा ठाकूर यांनी केली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कर सल्लागार शाळीग्राम तायडे आणि कॅबिलेपिल्स आणि स्किन क्लिनिकचे संस्थापक डॉ. प्रशांत इंनरकर उपस्थित होते. स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रेडिओ जॉकी आर. जे. बंड्या यांनी केले. कावेरी तांबे यांनी आभार मानले. शिल्पा मगरे गाडेकर, निकिता गायकवाड आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments