Tuesday, April 22, 2025
Homeताजी बातमीठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी घेतली बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची भेट…

ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी घेतली बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंची भेट…

पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी आज राहुल कलाटे यांची भेट घेतली.

या भेटींनंतर सचिन अहीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. ‘राहुल कलाटे यांनी निवडणुकीत माघार घ्यावी, भविष्यात महाविकास आघाडीकडून त्यांना राजकीय मदत केली जाईल’, उद्धव ठाकरेंचा हा निरोप आम्ही त्यांना दिला. तसेच त्यांचं आज उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणं झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह ग्राह्य धरून त्यांनी या निवडणूक माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याची प्रतिक्रिया सचिन अहीर यांनी दिली.

दरम्यान, याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नसून कार्यकत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू, असं कलाटे यांनी सांगितलं असल्याचंही अहीर म्हणाले. तसेच राहुल कलाटे हे नक्कीच माघार घेतील आणि महाविकास आघाडीबरोबर राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments