20 November 2020.
महाराष्ट्रातील जनतेला वीजबिलांबाबत कुठलाही दिलासा देण्यास महाविकास आघाडी सरकारने नकार दिला आहे. त्याविरोधात आता भाजपसह विरोधी पक्षांनी चांगलीच टीका करण्यास सुरुवात केली आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन ट्विट केलं आहे.
अगोदर माझं कुटुंब, माझी जबाबदारी आणि आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी, ठाकरे सरकार सुधरणार नाही, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.