Tuesday, February 11, 2025
Homeगुन्हेगारीसाईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची नजर, दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून रेकी...?

साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची नजर, दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून रेकी…?

साईनगरी शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याचं समोर आलं आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून शिर्डीत रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. गुजरात एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मिळत आहे.

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे गुजरात एटीएसने म्हटलं आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्याने याआधीही साई मंदिराला धमकीचे निनावी पत्र तसेच मेल आले आहेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

धक्कादायक घटना समोर आल्यानंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक केलेले अतिरेकी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी चव्हाणके यांच्या शिर्डी येथील घराची रेकी केली आहे. या अतिरेक्यांकडे अवैध हत्यारं, विस्फोटक पदार्थ जप्त करण्यात आलं आहेत. या अतिरेक्यांचे पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचं गुजरात एटीएसनं म्हटलं आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवींसह दोन अशा आठजणांना अटक करण्यात आली असून त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीही शिर्डी संस्थानाला धमकीचे फोन आणि मेल आले होते. जगप्रसिद्ध साईमंदिराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशातच मोठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच, दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आल्याचं उघड होताच शिर्डीतील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments