03 November 2020
सोमवारी रात्री ऑस्ट्रियामध्ये दहशदवादी हल्ला झाला. ह्या हल्ल्यामध्ये मध्ये तिघाचा मुत्यू झाला असून त्या मध्ये एका हल्लेखोरांचाही समावेश आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथे काल रात्री दहशदवादी हल्ला झाला. त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारीही जखमी झाले.
ऑस्ट्रियामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केल्याने रेस्टारंट,बार मध्ये बरीच गर्दी होती. AFL ने दिलेल्या वृत्तानुसार, रायफलच्या साहाय्याने हा गोळीबार करण्यात आला. वेगवेगळ्या सहा ठिकाणाहून हा गोळीबार करण्यात आला. रात्री आठच्या सुमारास हा हल्ला झाला.
ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केल आहे . ह्या हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून, इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष दल बोलवण्यात आले आहे. शोध फक्त व्हिएन्नापुरता मर्यादित नसेल असेही सांगण्यात आले आहे.