Sunday, July 20, 2025
Homeगुन्हेगारीपिंपरी चिंचवडमध्ये भीषण दुर्घटना, पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण दुर्घटना, पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा मृत्यू

एकीकडे विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तकलादू पद्धतीने केले होते बांधकाम

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरीच्या सदगुरु नगर या ठिकाणी असलेली एक पाण्याची टाकी कोसळली. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी साधारण ७ च्या दरम्यान ही पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडली.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

या टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments