वाढत्या कोरोनाच्या संकटामुळं जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कठोर कारण्याबरोबच कडक निर्बंधही लावाले आहेत. ओमिक्रोन व कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानंतर मकर संक्रातीच्या निमिताने देहूतील विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 14 जानेवारी मकर संक्रातीला मंदिर बंद ठेवण्याचादेवस्थान प्रशासनानं घेतला आहे. 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.
महिलांची गर्दी रोखण्यासाठी नियोजन मकर संक्रातीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासहामहाराष्ट्राच्या विविध भागातून महिला विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना ओवसा वाहण्यासाठी देहू मध्ये दाखल होतात. मात्र मागील दोन वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळं सर्व देवस्थाने बंद होती. त्यामुळे सॅण उत्सवही मोठ्याप्रमाणात साजरे करता आलेले नाहीत. यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानेतसेच मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देवस्थान प्रशासनान हा निर्णय घेतला आहे.
आळंदीतील मंदिरही बंद राहणार.. !
आळंदीमधील संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरही दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 14 जानेवारीच्या मकर संक्रातीला राज्यातील भाविक आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात. या गर्दीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून 13 जानेवारीच्या रात्री 8 वाजल्यापासून 15 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. एक परिपत्रक जारी करत आळंदी देवस्थानानं तसं जाहीर केलंय.