Monday, December 4, 2023
Homeमहाराष्ट्रटीम इंडियाने २० वर्षाचा दुष्काळ संपवला… विश्वचषक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ४ राखून...

टीम इंडियाने २० वर्षाचा दुष्काळ संपवला… विश्वचषक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ४ राखून विजय 

भारताने २० वर्षाचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडवर चार गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. मात्र, या दरम्यान विराट कोहलीचे शतक पाच धावांनी हुकले. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे. वर्ल्ड कप २०२३मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. या आवृत्तीचा हा २१वा सामना होता. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, त्याचे ४९वे शतक हुकले.

भारताने न्यूझीलंडचा पराभव केला

भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये किवी संघाचा विजय रथ भारताने रोखला आहे. दुसरीकडे, टीम इंडिया अजूनही या स्पर्धेत अजिंक्य आहे. या विजयासह भारतीय संघाचे १० गुण झाले असून भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडला पहिला पराभव पत्करावा लागला असून हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयासह टीम इंडियाने २०१९ विश्वचषकातील उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा देखील बदला घेतला.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रित बूमराह आणी मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments