हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माण-मारुंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले. हिंजवडी पोलिसांनी हे बॉम्बशेल ताब्यात घेऊन संरक्षण विभागाच्या ताब्यात दिले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, माण-मारुंजी रस्त्यावर ब्ल्यू रिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पुलाचे काम सुरु आहे. सोमवारी जेसीबीने खोदकाम करत असताना बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. त्यामुळे तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वस्तूची पाहणी केली. त्रयामध्णये गाड्याच्या बॉम्बचा पुढील भाग (बॉम्बशेल) असल्याचे आढळून आले. मात्र हे बॉम्बशेल खूप जुने असल्याने त्याला सुरक्षितपणे संरक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आले.संरक्षण विभागाकडून त्याची पाहणी करून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.