२५ जानेवारी २०२०
१० जानेवारी २०२० ला प्रदर्शित झालेल्या तान्हाजी: द अनसंग वॉरिअर या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १०७.६८ कोटींचा टप्पा घातला होता. त्यांनतर हा चित्रपट हॉउसफ़ुल्ल चालला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश तसेच हरियाणा ह्या राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला. आता तान्हाजी हा चित्रपट २०० कोटीचा टप्पा पार करत आहे. तुमच्यामुळे हा चित्रपट चालत असून, या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवल्याबद्दल अजय देवगण याने ट्विट करत प्रेक्षकांचे आभार मानले.
ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडली या चित्रपटाच्या माध्यमातून ओम राऊत यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यांचा हा पहिलावहिलाच चित्रपट हिट होत असल्याचे दिसत. छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी याच्यावर प्रेम असणाऱ्यांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले.
तान्हाजी :द अनसंग वॉरिअर चित्रपटामध्ये पुन्हा एकदा आपल्याला काजोल व अजय ची केमिस्ट्री पाहायला मिळाली. अजयचा हा १०० वा सिनेमा असल्याने हा सिनेमा त्याचा अगदी जवळचा आहे. या निमित्ताने त्याने एक नवीन पोस्टर हि ट्विटर वर प्रदर्शित केले.