11 November 2020
कोरोनामुळे ऑटो विक्री सुधारण्यासाठी विविध कंपन्या मोठमोठ्या ऑफर ग्राहकांना देऊ करत आहेत.ह्या मध्ये आनंदाची बातमी म्हणजे देशाला पहिल्या ५ स्टार कार देणाऱ्या टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकेसोबत करार केला आहे.
यानुसार ग्राहकांना कमीतकमी ईएमआयमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर कार घरी घेऊन जाता येणार आहे. यानुसार लाखाला केवळ 799 रुपयांचा ईएमआय देऊन कार घरी नेता येणार आहे.
यासाठी टाटा मोटर्स आणि एचडीएफसी बँकेने दोन योजना लाँच केल्या आहेत. ग्रॅज्युअल स्टेप अप स्कीम आणि टीएमएम फ्लेक्सी ड्राईव्ह अशी या योजनांची नावे आहेत.
या ऑफरनुसार ग्राहक लाखाला कमीतकमी ईएमआय 799 रुपये देऊन कार विकत घेऊ शकणार आहेत. यामध्ये कार आणि त्याचे व्हेरिअंटवर ईएमआय़ अवलंबून आहे.
ह्या योजनेत पुढील दोन वर्षांत हळूहळू ईएमआय वाढत जाणार आहे.मात्र, ही वाढ ग्राहकाच्या पसंतीनुसारच होणार आहे. या योजनेनुसार ग्राहक प्रत्येक वर्षाला कोणतेही तीन महिने निवडू शकणार आहेत. या तीन महिन्यांत ग्राहक लाखाला 789 रुपये एवढा कमी ईएमआय देणार आहेत.
याचबरोबर टाटा मोटर्सच्या कारवर एचडीएफसी एक्स शोरुम 100 टक्के कर्ज देणार आहे. हे कर्ज वरील दोन्ही स्कीमवर उपलब्ध आहे.