Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रविचारांच्या कक्षा ओलांडून भारत महासत्ता होण्यासाठी पुढाकार घ्या – शंकर जगताप

विचारांच्या कक्षा ओलांडून भारत महासत्ता होण्यासाठी पुढाकार घ्या – शंकर जगताप

शहर भाजपातर्फे विविध ११ आघाडयांची जम्बो कार्यकारिणी जाहिर

देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्र उभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत @२०४७’ संकल्पनेसाठी प्रत्येकाने आपल्या विचारांच्या कक्षा ओलांडून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान करून भारत महासत्ता होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) आयोजित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आचार्य अत्रे सभागृह, नेहरूनगर येथे मंगळवारी पार पडला. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, सांस्कृतिक प्रकोष्ठ, बेटी बचाव बेटी पढाओ, किसान मोर्चा, वैद्यकीय प्रकोष्ठ, दिव्यांग सेल, ट्रान्सपोर्ट सेल, अल्पसंख्यांक मोर्चा, जैन प्रकोष्ठ, कामगार मोर्चाच्या जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. तसेच, विविध प्रकोष्ठचे ४५० हून अधिक नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश युवा मोर्चा सचिव अजित कुलथे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, माजी महापौर आर. एस. कुमार, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, सोमनाथ भोंडवे, नगरसेविका शारदा सोनवणे, युवा मोर्चा सरचिटणीस दीपक नागरगोजे, सतीश नागरगोजे, जैन प्रकोष्ट संयोजक संदेश गदिया, कविता हिंगे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चौंधे, किसान मोर्चा चिटणीस प्रेमनाथ बोराटे, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका प्रीती कामतिकर, ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष दीपक मोढवे, अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश सचिव जमीर मुल्ला, जमील औटी, सनदी लेखा प्रकोष्ट बबन जंगले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शंकर जगताप पुढे म्हणाले, मोदीजींच्या गॅरंटीला सर्वांनी प्रतिसाद दिला आहे. भारताचे जागतिक स्तरावरील स्थान मजबूत झाले आहे. भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक म्हणून उदयास पावत आहे. आपले ध्येय, संकल्प विकसित भारतासाठी असले पाहिजे, याद्वारे सुसंस्कारित, बुद्धिमान, अशी युवा पिढी तयार होईल आणि आगामी काळात देशाचे नेतृत्व करेल, देशाला योग्य दिशा देईल. डिजिटल इंडिया, स्वच्छता अभियान यासह कोरोना काळ आपण पहिला आहे. युवा शक्तीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे. देश उत्तुंग भरारी घेत आहे. अनेक देशांनी योग्य वेळेत जलद बदल करुन त्या ठराविक कालावधीत देशाचा विकास केला आहे. आता हीच योग्य वेळ आहे. अमृत काळाच्या प्रत्येक क्षणी आपल्यापुढे विकसित देश म्हणून उभे करण्याचाच ध्यास असला पाहिजे. आज देश अनेक क्षेत्रात प्रगती करीत आहे.

आशियाई खेळांमधील कामगिरी, जन-धन खाती, कोविड काळात लसींचा विकास, चांद्रयान मिशन, टीबी नियंत्रण, डिजिटल पायाभूत सुविधांची निर्मिती यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तसेच जी-२० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. भारतासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करून देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी सहभाग घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या गॅरंटीचा सर्वांना विश्वास द्या, असे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments