Wednesday, June 18, 2025
Homeअर्थविश्वमिळकत कर अभय योजनेचा लाभ घ्या; शास्ती रकमेच्या ९० टक्के सवलत मिळवा…

मिळकत कर अभय योजनेचा लाभ घ्या; शास्ती रकमेच्या ९० टक्के सवलत मिळवा…

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील मिळकतधारकांसाठी २२ जानेवारीपासून मनपाकर शास्ती (दंड) रक्कममध्ये सवलतीसाठी अभय योजना राबविण्यात येणार आहे. मुदतीत मिळकतकर न भरणा-या मिळकतधारकांना प्रती महा २ टक्के दराने मिळकतकर बिलामध्ये मनपाकर शास्ती (दंड) आकारण्यात येत आहे.

३१ जानेवारीपूर्वी थकबाकीसह संपूर्ण कराचा एक रक्कमी भरणा करणा-या मिळकतधारकांना एकूण मनपाकर शास्ती (दंड) रकमेच्या ९० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच ०१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपूर्ण मिळकत कराचा भरणा करतील त्यांना मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेच्या ८० टक्के व १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीमध्ये भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती (दंड) रक्कमेचे ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व करसंकलन विभागीय कार्यालय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार असून मिळकतधारकांना कराची रक्कम रोख / धनादेश / डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. तसेच महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकतकर भरणा केलेला नाही, अशा मिळकतधारकांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची रक्कम भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मिळकत कराच्या थकीत रक्कमा आहेत. अशा थकबाकीदारांचे मिळकती जमीची कार्यवाही करणेत येणार आहे, असे पालिकेने पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments