खासदार अमोल कोल्हेंनी घेतली आळंदी मधील प्रलंबित प्रश्नांसाठी बैठक
३ जानेवारी २०२०,
खासदार अमोल कोल्हे यांनी आज आळंदी नगर परिषदेतपदधिकाऱ्यांची बैठक घेत आळंदी शहराचे प्रश्न जाणून घेतले. मात्र यावेळी नागरिकांनी आणि पदाधिकार्यांनी आळंदी शहरातील समस्यांचा पाढाच सुरु केल्याने अमोल कोल्हेंच्या डोक्याला मनस्ताप झाला.
तीर्थक्षेत्र आळंदी येथे पिण्याच्या तापण्याची समस्यां गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे, यावर तोडगा काढण्यासाठी आणि तीर्थक्षेत्र आळंदी चे प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी आज खासदार कोल्हे यांनी एक बैठक घेत आढावा घेतला. यावेळी शहरातील समस्यांचा पाढा ऐकून खासदार थक्कच झाले दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने भाजपकडून द्वेषाचे राजकारण सुरू झालंय. असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेनी भाजपवर टीका केलीये. राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यात आलंय. यावर बोलताना कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिलीये. तसेच या प्रक्रियेवर शंका ही उपस्थित केल्यात.आळंदीत ते पत्रकारांशी बोलत होते.