पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाचा शोध लागला आहे. दहादिवसानंतरपुनावळे येथे तो सापडला असून अपहरणकर्ते पळून गेले आहेत.
स्वर्णव उर्फ डुगु असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. दहा दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते. एक दुचाकीस्वार त्यालादुचाकीवरुन घेऊनगेला होता. याचे चित्रिकरण सीसीटीव्ही मध्ये झाले होते.
डुगुचे अपहरण झाल्यापासून पुणे शहर पोलीस त्याचा शोध घेत होते. संपूर्ण पोलीस यंत्रणा त्याच्या शोधात लागली होती. अपहरणकर्त्यांनीकोणतीही मागणी किंवा फोन नातेवाईकांना केला नव्हता, त्यामुळे तपासात अडचण निर्माण झाली होती.
डुगूचा शोध घेणे एक आवाहन निर्माण झाले होते. त्याच्या वडिलांनी सर्वपरी प्रयत्न सुरु केले होते. अखेर आज बुधवारी दुपारी डुगूपुनावळेपरिसरात आढळून आला. अपहरणकर्ते त्याला सोडून पळून गेले आहेत.
डुगू चा शोध कसा लागला?, त्याला कोणी आणले?, अपहरणकर्ते कुठे आहेत? याबाबतीत सविस्तर माहीती पोलिस घेत आहेत.