Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमी'स्वरसागर महोत्सव २०२०’ अभिजात स्वरांचा उत्सव, २३ जानेवारी पासून

‘स्वरसागर महोत्सव २०२०’ अभिजात स्वरांचा उत्सव, २३ जानेवारी पासून

१९ जानेवारी २०२०,
पिंपरी चिंचवड मधील संगीत प्रेमीसाठी आनंदाची बातमी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि संगीत पर्वणी मिळणार असून ‘स्वरसागर महोत्सव २०२०’ दिनांक २३ जानेवारी २०२० गुरुवार पासून सुरु होणार असून सलग तीन दिवस २३,२४, २५ जानेवारी २०२०,पर्यंत रोज संध्याकाळी ६.३० वाजता, निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर पार पडणार आहे.

या महोत्सवाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेटर प्रसिध्द शास्त्रीय गायक महेश काळे आहेत,या संगीतमहोत्सवा दरम्यान प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रसिध्द गायकांना ऐकण्यास भेटणार आहे.

दिनांक २३ जानेवारी गुरुवार रोजी प्रसिध्द गायिक संदीप उबाळे आणि सुनंदा राठोड, बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरवात होणार असून, दिनांक २४ जानेवारी २०२० शुक्रवार रोजी पवित्र भट आणि श्रद्धा शिंदे यांचा भारतीय शास्त्रीय नृत्यचा कार्यक्रम होईल. तर लुईझ बँका, गिनो बँक्स, शेल्डन डी’सिल्वा, इशिता चक्रवर्ती, जॉर्ज ब्रुक्स यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्राचें लोकरंग लोकशाहीर रामानंद उगले यांचा कार्यक्रम होईल तर सांगता समारंभ प्रसिध्द शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या गायनाने होईल.

वरील सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत,तरी याचा लाभ सर्व पिंपरी चिंचवडकरांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments