पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान २.० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ची अंमलबजावणी सुरु आहे . त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत स्वच्छोत्सव मशाल यात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानुसार ड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत राजमाता जिजाऊ उद्यान ,पिंपळे गुरव येथील स्वच्छोत्सव मशाल यात्रा कार्यक्रम आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच अ क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने खंडोबा मंदिर आकुर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छोत्सव मशाल यात्रा कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत विविध ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त अजय चारठाणकर, स्वच्छ समन्वय कक्ष प्रमुख सोनम देशमुख, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, उमाकांत गायकवाड, सिताराम बहूरे, शीतल वाकडे, राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, सहायक आरोग्यधिकारी तानाजी दाते,राजू साबळे ,महादेव शिंदे ,महेश आढाव, राजेश भाट,शांताराम माने,कुंडलिक दरवडे आणि माजी पदाधिकारी, नगरसेवक ,नगरसेविका,सामजिक संस्था आयसी टीम, बेसिक टीम, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे ठिकाण
- अ क्षेत्रीय कार्यालय- खंडोबा मंदिर आकुर्डी
- ब क्षेत्रीय कार्यालय- गुरुद्वारा चौक वाल्हेकरवाडी, चाफेकर चौक चिंचवडगाव
- क क्षेत्रीय कार्यालय- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,लांडेवाडी
- ड क्षेत्रीय कार्यालय- राजमाता जिजाऊ उद्यान ,पिंपळे गुरव
- इ क्षेत्रीय कार्यालय- भारतमाता चौक,मोशी
- फ क्षेत्रीय कार्यालय- शिवरकर चौक ते म्हेत्रे गार्डन
- ग क्षेत्रीय कार्यालय- धनगरबाबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा थेरगाव गावठाण