Friday, December 6, 2024
Homeताजी बातमीगौरी गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेची जय्यत तयारी; १३० खासगी जीवरक्षकही तैनात

गौरी गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेची जय्यत तयारी; १३० खासगी जीवरक्षकही तैनात

गणेशोत्सवातील पाचव्या दिवशी होणाऱ्या घरगुती गणेश विसर्जनासाठीची महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, औषधोपचार व्यवस्था, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवरील कर्मचारी व्यवस्थापन, जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणेची कामे पूर्ण झाली आहेत. विसर्जनासाठी अस्तित्वातील हौदांची दुरुस्ती करण्यात आली असून, रंगकाम पूर्ण झाले आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.

विसर्जन घाटांवर अग्निशमन दल आणि जीवरक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मुकादम, विद्युत विभागातील कर्मचारी यांना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गणेश मूर्ती संकलन आणि दान केंद्रांची व्यवस्थाही क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात आली आहे. नदी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी धोका नियंत्रक कठडे उभारण्यात आले आहेत.

अग्निशमन दलाकडून १८ विसर्जन घाटांवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १३० खासगी जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. रात्रपाळीत काम करणाऱ्या जीवरक्षकांना फ्लोरोसेन्ट जॅकेट्स देण्यात आले असून नदी किनारी सुरक्षेच्या दृष्टीने दोरखंड लावण्यात आले आहेत. अग्निशमन दलाची बिनतारी संदेश यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

विसर्जन घाट

संगम घाट, वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर, बापू घाट, विठ्ठल मंदिर, ठोसरपागा, राजाराम पूल, नेने घाट, ओंकारेश्वर घाट, पुलाची वाडी, खंडोजी बाबा चौक, गरवारे महाविद्यालयामागील बाजू, दत्तवाडी घाट, औंधगाव घाट.

आपत्कालीन संपर्क क्रमांक

०२०-२५५-१२६९
०२०-२५५०६८०० (१/२/३/४)
गणेश सोनुने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- ९६८९९३१५११

देवेंद्र पोटफोडे अग्निशमन प्रमुख- ८१०८०७७७७९, ०२०-२६४५१७०७
अग्निशमन दल- १०१

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments