जीतो पिंपरी-चिंचवड चॅप्टरतर्फे ‘ ग्रँड बाजार 2023 या विशेष प्रदर्शना चे आयोजन 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यत करण्यात आले होते. महासाध्वी डॉ. श्री संयमलताजी म.सा. साध्वी डॉ. श्री अमितप्रज्ञाजी म. सा. साध्वी श्री कमलप्रज्ञाजी म.सा. साध्वी श्री सौरभप्रज्ञाजी म.सा. यांच्या उपस्थित मध्ये प्रदर्शना चे उदघाटन झाले. ग्रँड बाजार 2023 ’ हा एक ट्रेड शो होता, जो उडान प्रकल्पाचा एक भाग आहे. बझारमध्ये 80 हून अधिक महिला उद्योजकांनी प्रदर्शक म्हणून सहभाग घेतला.तसेच डान्स,गणपतिजी ची मुतीॅ बनवाने,मंडाला आर्ट,वारले पेन्टिंग या प्रकारचे वर्कशाॅपही घेण्यात आले.
खरेदी साठी आलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती . ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धारिवाल आणि दिना प्रकाश धारिवाल, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला, नितीन बेदमुथा सीएफई अपेक्स प्रोजेक्ट सेक्रेटरी तृप्ती कर्नावट, जीतो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे अध्यक्ष मनीष ओसवाल, मुख्य सचिव योगेश बाफना, यूथ विंगचे अध्यक्ष सौरभ वेदमुथा , मुख्य सचिव प्रणव खाबिया या मान्यवरांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
लेडिज विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना तसेच मुख्य सचिव योगिता लुंकड, कोषाध्यक्ष सारिका सोलंकी, प्रकल्प समन्वयक पूनम बंब आणि सोनल भंडारी यांच्या नेतृत्वाखालील महिला संघाच्या टीमचे सगळीकडे कौतुक झाले. या प्रयत्नात जीतो युवक संघाचे अतूट सहकार्य लाभले .
हे प्रदर्शन पाटीदार भवन निगडी येथे भरवण्यात आले