Tuesday, October 13, 2026
Homeआरोग्यविषयककळसुबाई मोहीम यशस्वी; हॅपी फॅमिली ट्रेकर्सच्या २० शिलेदारांनी सर केले सह्याद्रीचे सर्वोच्च...

कळसुबाई मोहीम यशस्वी; हॅपी फॅमिली ट्रेकर्सच्या २० शिलेदारांनी सर केले सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आणि सह्याद्रीचा मुकुटमणी मानल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर (१६४६ मीटर) हॅप्पी फॅमिली ट्रेकर्स असोसिएशनच्या २० सदस्यांनी यशस्वी चढाई केली. यापूर्वी राजगड, तोरणा, रायगड, ब्रह्मगिरी आणि अंजनेरी या गड-किल्ल्यांवर मोहिमा राबविल्यानंतर असोसिएशनने कळसुबाई शिखर सर केले.

२६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजता बारी गावातून या मोहिमेला सुरुवात झाली. हातात टॉर्च, डोक्यावर हेडलॅम्प आणि मनात जिद्द घेऊन ट्रेकर्सनी अंधारातच चढाई सुरू केली. थंडी, दाट धुके आणि खडतर चढाईवर मात करत सकाळी १० वाजता सर्व ट्रेकर्स कळसुबाई मंदिर परिसरात पोहोचले. शिखरावर पोहोचल्यानंतर ‘हर हर महादेव’ आणि ‘जय महाराष्ट्र’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

या मोहिमेत मोहिमेत इंडो अथलेटिक्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अँड. गजानन खैरे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, भारत फोर्ज मधील अधिकारी श्री. दत्तात्रय कदम, पोलीस अधिकारी श्री. श्रीरंग  निगडे, उद्योजक श्री. पांडुरंग सोनवणे साहेब, उद्योजक सुदेश कोलते, पुणे जिल्हा परिषद गटविकास अधिकारी श्री. संजय ढमाळ, टाटा मोटर्स चे अधिकारी श्री. संजय कदम, बजाज ऑटो चे अधिकारी श्री. युवराज जगताप, सहाय्यक वनसंरक्षक नितीश निगडे, अँड. शुभम कदम, अनुज खैरे, अभिषेक जगताप, ऋतुराज सोनवणे, चालुक्य खैरे, दिशा खैरे, राजवर्धन खैरे तर महिलांमध्ये प्रो.सीमा जगताप, वैशाली कदम, वंदना कदम, रजनी खैरे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.

या मोहिमेचे नियोजन, मार्गदर्शन आणि लॉजिस्टिकची जबाबदारी सदस्यांनी यशस्वीपणे पार पाडली. संस्थेचे प्रमुख विश्वस्त व उद्योजक देवानंद कदम यांच्या नियोजनामुळे मोहीम कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी अॅड. गजानन खैरे म्हणाले, “कळसुबाई म्हणजे फक्त ट्रेक नाही, ती एक साधना आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. हॅप्पी फॅमिली ट्रेकर्स असोसिएशन कुटुंबाला एकत्र आणण्यासोबतच महाराष्ट्राच्या कणखर सह्याद्रीची ओळख नव्या पिढीला करून देत आहे.”

आगामी काळात असोसिएशनच्या वतीने आणखी विविध ट्रेकिंग मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असून, निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments