Tuesday, March 10, 2026
Homeगुन्हेगारीपिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-५ ची यशस्वी कारवाई,दरोड्यातील ३५.६ तोळे सोने, ३ किलो...

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-५ ची यशस्वी कारवाई,दरोड्यातील ३५.६ तोळे सोने, ३ किलो चांदी ₹२५ लाख किमंतीचा मुद्देमाल जप्त; चार जण अटकेत

पिंपरी | १५ जुलै २०२५ (प्रतिनिधी):

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा क्राईम युनिट-५ ने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष कसबे यांच्या नेतृत्वाच अवघ्या आठ दिवसांतच जबरदस्त कामगिरी करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणात गुंतलेल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ३५.६ तोळे सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी असा एकूण २५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष कसबे यांचा अचूक तपास आणी गुन्हेगारांचा बंदोबस्त

ही यशस्वी कारवाई  युनिट-५ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष कसबे त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मिळालेल्या गुप्त माहितीनंतर अचूक माहिती संकलन, सततची निगराणी, व अचूक नियोजन यावर भर देत आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली. ही टोळी चोरीस केलेल्या  चारचाकी वाहनांचा वापर करून विविध भागांत घरफोड्या करत होती.

या आरोपींनी शहरातील विविध भागांत योजनाबद्ध पद्धतीने घरफोड्या केल्या होत्या. पोलिस तपासात त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.यामध्ये आरोपी यशोदास राठोड वय वर्षे २७ , रितेश करणसिंग राठोड वय वर्षे  २७, आकाश रवी मैनावत वय वर्षे २९, तसेच रितिक मैनावत वय २१ , अभिषेक रंजित नानावत अशी नावे आहेत. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल:३५.६ तोळे सोन्याचे दागिने३ किलो चांदी ₹२५,३२,०००/- रोख रक्कम एकूण मुद्देमालाची अंदाजे किंमत ३५ ते ४० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईसाठी मा. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावळकर, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष कसबे (गुन्हे शाखा युनिट ५), सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसलें, व तांत्रिक विश्लेषण शाखेचे कर्मचारी सफीफो माळी, तसेच खालिल अधिकारी व अंमलदारांनी महत्वाची भूमिका बजावली – पोहवा पवार (७४९४), सूर्यवंशी (१५५५), माने (१४४१), गोटने (१२१८), शेख (११००), सोडगिर (१३००), खेडकर (१३९५), गाडेकर (१८९८), इघारे (१३७३), गुंधे (२५१९), मुंडे (२१९०), सोनवणे (१५५४), ब्रम्हणे (२९९२), ननावरे (३०६८), कारके (४२४०), आणि हुलगे (२३२६).

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments