Tuesday, July 8, 2025
Homeअर्थविश्वबार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन…

सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी रु. 31000/- व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षिक आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते. एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.डी (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे अधिकृत संकेतस्थळ https://barti-maharashtragov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments