Sunday, February 15, 2026
Homeअर्थविश्वमहाविद्यालयांच्या नोंदणी अभावी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

महाविद्यालयांच्या नोंदणी अभावी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

९ जुलै २०२१,
अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्यापही ‘महाडीबीटी’ संके तस्थळावर नोंदणी के ली नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यापासून वंचित राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी राज्य शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी संके तस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी महाविद्यालयांनी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

समाजकल्याणच्या सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध के ले आहे. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ महाडीबीटी संके तस्थळाद्वारे दिला जातो. २०१८-१९ पासून महाडीबीटी या संकेतस्थळामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

मात्र अद्यापही जिल्ह्य़ातील बऱ्याच अनुदानित-विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी (अकरावी-बारावी) महाडीबीटी संकेतस्थळावर नोंदणी केल्याचे दिसून येत नाही. महाविद्यालयांनी नोंदणी केली नसल्याने संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अर्जासाठी.. महाविद्यालयांनी महाडीबीटी संके तस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्ती, फ्रीशिप योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. या अर्जाची महाविद्यालयाकडून तपासणी, पडताळणी करून समाजकल्याण विभागाकडे मान्यतेसाठी सादर करावेत. या अर्जाची पडताळणी केल्यानंतर ऑनलाइन मान्यता दिली जाईल.नोंदणीसाठी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनांसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments