Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वमोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय

मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय

पिंपरी, दि. १५ जुलै २०२६ : मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सभेत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासह दोषींवर कठोर कारवाई, सखोल चौकशी आणि शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

महापालिकेने दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ठेकेदार मे. अँटोनी लारा यांच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

याशिवाय, मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबातील पात्र वारसांना महानगरपालिका सेवेत नोकरी मिळण्यासाठी शासनाकडे आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

दुर्घटनेच्या अनुषंगाने मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुर्घटनेची कारणे, तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी आणि संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच अँटोनी लारा कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा निरीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम आणि विकेंद्रीकृत करण्याच्या दृष्टीने, महापालिकेच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देशही सभेत देण्यात आले.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, दुर्घटनेत जीव गमावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत देऊन आमचीजबाबदारी संपणार नाहीत्यांच्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारतपात्र वारसांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी शासनाकडेपाठपुरावा केला जाईलत्याचवेळी या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाहीनिष्पक्ष चौकशीतूनजबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments