Saturday, September 30, 2023
Homeक्रिडाविश्वसशक्त राष्ट्राची निर्मिती क्रिडांगणावर - महापौर माई ढोरे

सशक्त राष्ट्राची निर्मिती क्रिडांगणावर – महापौर माई ढोरे

एसबीपीआयएममध्ये आंतर महाविद्यालयीन ‘युवोत्सव’ सुरु

१ फेब्रुवारी २०२०,
सशक्त राष्ट्राची निर्मिती क्रिडांगणावरच होते. ज्या देशातील युवक क्रिडांगणावर जास्त वेळ घालवितात. तेच देश आपले क्रिडानैपुण्य दाखवून ऑलिपिंक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाचे नाव झळकवतात. पुढील 25 वर्षे भारत देश जगात युवकांचे राष्ट्र म्हणून ओळखले जाईल. परंतू क्रिडा मार्गदर्शकांनी आणि युवकांनी जर क्रिडांगणावर जास्त वेळ देऊन परिश्रम घेतले, तर भविष्यात ऑलिपिंकमध्ये आपले राष्ट्र पदक विजेत्यांच्या यादित पहिल्या दहामध्ये येईल असा विश्वास पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील एसबी पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (एसबीपीआयएम) ‘युवोत्सव’ या फुटबॉल व व्हॉलीबॉलच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धाचे उद्‌घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. ‘युवोत्सव’ या स्पर्धांचे हे सहावे वर्ष आहे. यामध्ये फुटबॉलच्या स्पर्धेत पुणे, मुंबई, अहमदनगर मधील 31 महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला आहे. तर बास्केट बॉलमध्ये पुणे, मुंबई, अहमदनगर मधिल पुरुष 12 संघ आणि महिलांच्या 6 संघांनी सहभाग घेतला आहे. ‘टिक – टॉक’ स्पर्धेत 11 टिम सहभागी झाल्या तर ‘पन्ना गेम’ मध्ये 20 संघांनी सहभाग नोंदविला आहे.

उद्‌घाटन प्रसंगी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, एसबीपीआयएमचे प्राचार्य डॉ. सी.एन.नारायणा, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. किर्ती धारवाडकर, डॉ. अमरिश पद्मा, डॉ. काजल माहेश्वरी, पंच निखिल पाटील, अभिषेक नागुलपेल्ली, विद्यार्थी प्रतिनिधी नंदलाल पारिक, विशाल निकम, शुभम शिंदे, देवेंद्र मुथा, अमरीत सिंग आदींसह सहभागी खेळाडू उपस्थित होते.

‘युवोत्सव’ चे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, एसबीपीआयएमचे प्राचार्य डॉ. सी.एन. नारायणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments