Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकपुण्यात निर्बंध कडक कि लॉकडाऊन ..? आज होणार निर्णय… अजित पवारांच्या उपस्थितीत...

पुण्यात निर्बंध कडक कि लॉकडाऊन ..? आज होणार निर्णय… अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

२ एप्रिल २०२१,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत बैठकीत निर्णय होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित आहेत.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बोललं जात आहे. पण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची स्थिती काहीशी चिंताजनक बनली असली तर लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा केला आहे. पण प्रशासन मात्र लॉकडाऊनच्या मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments