Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीआज होणारया एल्गार परिषदेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

आज होणारया एल्गार परिषदेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

३० जानेवारी २०२१,
स्वारगेट परिसरातील गणेश गला क्रीडा मंच येथे आज शनिवारी होणाऱ्या एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकांसह विशेष शाखा व गुन्हे शाखेचे दोनशेपेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. या परिषदेसाठी २०० नागरिकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

गणेश कला क्रीडा मंच येथे ३१ डिसेंबर २०२० रोजी येथील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून स्वारगेट पोलिस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली होती. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषद आयोजित करण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. पोलिसांनी परिषदेला परवानगी नाकारली; तर आम्ही परिषद रस्त्यावर घेऊ; तसेच जेलभरो आंदोलनाचा इशारा बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी एल्गार परिषदेला अटीवर परवानगी दिली आहे. तीन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबर २०१७ ला शनिवारवाड्यावर एल्गार परिषद घेण्यात आली होती. ती पुढे वादग्रस्त ठरली. त्यानंतर होणाऱ्या एल्गार परिषदेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments