Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीकार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी…!

कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी…!

११ ऑक्टोबर २०२१,
राज्यात घटनस्थापणेचा मुहूर्त साधून मंदिरे खुली करण्यात आली. मात्र, ऐन नवरात्रोत्सवात ही मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर भाविकांनी तुडुंब गर्दी केली असून नागरिकांना करोनाचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. कार्ला येथील एकविरा देवी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एकविरा देवीच मंदिर भाविकांसाठी बंद होते. मात्र, ठाकरे सरकारने भक्तांचे गाऱ्हाणे ऐकत घटनस्थापनेच्या दिवशी मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आणि नवरात्रोत्सवात राज्यातील मंदिरे उघडण्यात आली. त्यामुळे लोणावळ्यातील एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच, परिसरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळालं. रविवार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments