Wednesday, May 20, 2026
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड शहरात ९ डिसेंबर पासून राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन…

पिंपरी चिंचवड शहरात ९ डिसेंबर पासून राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन…

महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेद्वारे पिंपरी चिंचवड मध्ये मिनी सब ज्युनिअर गटाच्या राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन ९ ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या आयोजन पिंपरी विधान सभा मतदार संघाचे आमदार श्री. अण्णा दादू बनसोडे यांच्या विकास निधीतून पार पडणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक व पालक वर्ग मिळून ७०० लोक दर दिवशी उपस्थित होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन ९ डिसेंबर २०२२ रोजी मदनलाल धिन्ग्रा मैदान, निगडी येथे संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे. या स्पर्धा इंडियन, रिकरव व कामाऊंड या तिन्ही प्रकारात होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभा मध्ये धनुर्विद्या या खेळाचे पहिले मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण हे १० व ११ डिसेंबर २०२२ ला संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे. या स्पर्धे मुळे शहरात हा खेळ अधिक विकसित होणार आहे व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच या स्पर्धे मधून आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी चमू निवडल्या जाणार आहे. स्पर्धे दरम्यान ओलांपिक व इतर आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव सोनल बुंदेले यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments