Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीराज्य निवडणूक आयोगाकडून पालिका आयुक्तांना आदेश… प्रारूप प्रभागरचनेतील प्रस्ताव ६ जानेवारीला सादर...

राज्य निवडणूक आयोगाकडून पालिका आयुक्तांना आदेश… प्रारूप प्रभागरचनेतील प्रस्ताव ६ जानेवारीला सादर करा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेतील दुरुस्तीसह संपूर्ण प्रस्ताव येत्या ६ जानेवारीला सादर करावा, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना केल्या आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सद्य:स्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने तीन सदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले होते. त्यानुसार ५ डिसेंबरला महापालिकेने प्रारूप आराखडा आयोगाकडे सादर केला होता. मात्र, आयोगाने या आराखड्यात तब्बल २८ दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्यानुसार पालिका प्रशासनाला सूचना केल्या होत्या.

मात्र, या आयोगाने सुचविलेल्या दुरुस्तीसह प्रारूप प्रभाग निश्चित करण्याबाबत आयोगाकडून सूचना आलेल्या नसल्याने ही प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचेही लक्ष आयोगाच्या आदेशाकडे लागले होते. येत्या ६ जानेवारीला प्रारूप प्रभागरचनेचा संपूर्ण प्रस्ताव तयार करून तो संबंधित उपायुक्तांनी व्यक्तिशः उपस्थित राहून सादर करावा, असे आदेश आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रभागरचनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments