Tuesday, March 10, 2026
Homeउद्योगजगतमहापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर

महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अखेर निश्चित झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि खुल्या गटातील महिलांसाठी राखीव जागांची सोडत प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

या प्रक्रियेसाठी ९, १० आणि ११ नोव्हेंबर या तीन दिवसांत सर्व नियोजन पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाला देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ३२ प्रभाग आणि एकूण १२८ सदस्यीय जागा आहेत. नव्या लोकसंख्येच्या आणि अनुसूचित जाती-जमातींच्या अद्ययावत आकडेवारीच्या आधारे सहा प्रभागांमध्ये फेरबदल करण्यात आले असून, त्यानुसार आरक्षणातही आवश्यक बदल केले गेले आहेत.

आरक्षण सोडतीचा निकाल ११ नोव्हेंबरपर्यंत आयोगाकडे

राज्य निवडणूक आयोगाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राखीव जागांची संख्या निश्चित करून मान्यता घेण्याचा टप्पा ठेवला आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची अधिकृत अधिसूचना वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध केली जाईल. आरक्षण सोडतीचा अंतिम निकाल ११ नोव्हेंबरपर्यंत आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरक्षणाचे प्रमाण असे राहणार

सदर १२८ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३ जागा राखीव राहतील. प्रत्येक प्रभागातील अ, ब, क आणि ड या जागांची वाटणी सोडतीनंतर निश्चित होईल. खुल्या गटातील उमेदवारांमध्ये पुरुष आणि महिला दोघांनाही संधी असली, तरी राखीव जागांवर फक्त महिलाच उमेदवारी अर्ज करू शकतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments